…. पुन्हा काळरात्र

.… पुन्हा काळरात्र
मजुरांच्या घरांवर सिमा भिंत कोसळून सहा ठार ; चार जखमी
आंबेगाव बुद्रुक येथील घटना ; सोमवारी रात्री कोसळी भिंत
पुणे,दि.2- कोंढव्यातील ऍल्कोन स्टायलस सोसायटीतील पार्किंगची सीमाभिंत कोसळून 15 ठार झाल्याच्या घटनेत तीन दिवस होत नाहीत तोवर आणखी एका घटनेत सहा कामगारांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. आंबेगाव बुद्रुक येथे सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सीमाभींत कोसळून ही घटना घडली. या घटनेत चार कामगार मात्र बचावले गेले आहेत. नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना ढिगाऱ्याखालून काढल्याणे त्यांचे प्राण वाचले. हे कामगार मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील रहिवाशी आहेत. या निमीत्त पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा आणी बांधकाम व्यवसायीकांच्या निष्काळजीपणाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. दरम्यान अल्कॉन स्टायलस सोसायटीतील प्रकरणाची चौकशी समितीच आंबेगाव प्रकरणाचा एकत्र तपास करणार असल्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली. हा अहवाल आठ दिवसांत सादर केला जाणार आहे.
राधेशाम रामनरेश पटेल(25,रा.नवागड, छत्तीसगड), ममता राधेलाल पटेल(22, रा.नवागड, छत्तीसगड), प्रदेशनिन जेतूलाल पटेल(45,रा.रायपूर), जितू चंदन रावते(23,रा.पारडी, मध्यप्रदेश), प्रल्हाद चंदन रावते(30,रा.पारडी, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. तर श्रीनाथ विष्णू पटेल(17,रा.ककेडी, जि.मुगेली, छत्तीसगड), विष्णू पूनीत पटेल(42,रा.ककेडी, जि.मुगेली, छत्तीसगड), नगमथ विष्णू पटेल(38रा.ककेडी, जि.मुगेली, छत्तीसगड) दीपक रामलाल ठाकरे(24) अशी जखमींची नावे आहेत. संबंधीत जागा सखाराम गणपत कोंढरे यांची असून बाळासाहेब दांगड हे बांधकाम व्यवसायीक आहेत.
*सीमाभिंत कोणाची ? *
आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड पॉलिटेक्‍निकल इंन्स्टटयूटच्या सीमाभिंतीला लागूनच 19 गुंठे जागा आहे. यामधील निम्म्या जागेत पार्किंग आणी पाच मजली इमारत बांधली आहे. त्या लगतच्या मोकळ्या जागेत महाविद्यालयाच्या भिंतीला लागूनच कामगारांच्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. सोमवारी रात्री पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीमाभीत सहा झोपड्यांवर पडली. तसेच लगतची मोठी झाडेही झोपड्यांवर पडली. या झोपड्यांमध्ये एकूण 16 कामगार रहात होते. त्यातील सहा कामगार ढिगाऱ्याखाली पडून जागीच ठार झाले तर चार कामगार बचावले. शेजारी असलेल्या झोपडतील सहा कामगार मात्र सुरक्षीत राहिले. घटनास्थळावरील रहिवाशी ही भिंत सिंहगड महाविद्यालयाची असल्याचे सांगतात तर भारती विद्यापीठ पोलीस ही सीमाभिंत बांधकाम व्यवसायीकाची असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे सांगतात. यामुळे सिमाभिंत नक्की कोणाची हा प्रश्‍न सायंकाळपर्यंत उपस्थित राहिला होता.
… विदयार्थी बनले देवदूत
घटनास्थळापाशीच दोन इमारतीमध्ये महाविद्यालयीन विद्याथी भाडे तत्वावर रहातात. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना भिंती व झाड कोसळल्याचा मोठा आवाज आला. त्यापाठोपाठ जीवाच्या अकांताने बचावासाठी ओरडणाऱ्या मजूरांचा आवाज आला. यामुळे इमारतीती विद्यार्थी धावतच तिकडे गेले. तेथे सिमाभिंत असल्याने काहींनी त्यावरुन उडी मारुन तर काहींनी पलिकडच्या बाजूने जाऊन धाव घेतली. ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीघांना त्यांनी जीवंत बाहेर काढले. मातीचा ढिगारा आणी त्यावर पत्रा अशी दबलेल्यांची अवस्था होती. पत्र्यामुळे श्‍वास घेता येत असल्याने तीघे जीवंत बाहेर आले. मात्र उरलेले ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. तोवर पोलीस आणी अग्निशमन दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी उरलेले मृतदेह बाहेर काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)