राज्यात तिसऱ्या टप्प्यात ५७.०१ टक्के मतदान

मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार १४ मतदारसंघात एकूण ५७.०१ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली.

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यासाठी जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या १४ मतदारसंघात आज मतदान झाले. या मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.०१ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.

मतदारसंघातील आकडेवारी (टक्क्यांमध्ये)

जळगाव – ५२.२८

रावेर – ५६.९८

जालना – ५६.९२

औरंगाबाद – ५८.५२

रायगड – ५६.१४

पुणे – ४३.६३

बारामती – ५५.८४

अहमदनगर – ५७.७५

माढा – ५६.४१

सांगली – ५९.३९

सातारा – ५५.४०

रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ५७.६३

कोल्हापूर – ६५.७०

हातकणंगले – ६४.७९

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)