56 इंच छातीवाले रोजगार का देत नाहीत? : प्रियंका गांधींची खोचक टीका

प्रयागराज – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना राजकीय उलथापालथ देखील सुरू झाली आहे. यातच सर्व पक्षीय नेते विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल प्रचार दौऱ्यावेळी शाब्दिक टीका करत आहे.

दरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनीही काँग्रेसच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रियंका गांधींनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ विकासाच्या नावावर मोठमोठी स्वप्न दाखवितात मात्र विकास काहीच कुठेही दिसत नाही. तसेच तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही मोठा नेता आहात, तुम्ही 56 इंच छातीवाले आहेत तर रोजगार का उपलब्ध करून दिला नाही, कारण ते दुबळे सरकार आहे, अशी टीकाही प्रियंका गांधींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)