लोकसभेची मतमोजणी ३५ तासानंतर पूर्ण; एनडीए ३५० जागांवर विजयी

नवी दिल्ली – २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी चालू असलेली मत मोजणी अखेर बंद झाली आहे. तब्बल ३५ तासांच्या मत मोजीनी नंतर ५४२ जागांचे अधिकृत निकाल जाहीर जाले आहे. यामध्ये एनडीएने तब्बल ३५० जागांवर विजयी मिळवला असून, यामध्ये नुसत्या भाजपणे ३०३ जागा जिंकल्या आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचा विक्रम करून दाखवला आहे. मोदींच्या मार्गदर्शनाखाली भाजपला मिळालेलं हे आजपर्यंतचं सर्वात मोठ यश आहे.

लोकसभेत ऐकून सात ताप्यांमध्ये ५४२ जागांसाठी मतदान झाले असून, गुरवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. मात्र, अरुणाचल पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी मात्र लांबली. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेला तब्बल ३५ तासांचा कालावधी लागला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)