नवी दिल्ली- सध्या भाजपने राष्ट्रीय लोकशाही मध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादित केले असून, भाजपच्या या विजयाबद्दल जगातल्या विवध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांकडून मोदींना आणि भाजप पक्षाला विजयाचे शुभेच्छा संदेश येण्यास सुरुवात झाली आहे. सौदी अरेबियाचे राजे ‘सलमान बिन अब्दुलजाज अल सौद‘ यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून मोदींच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.
दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, एनडीएने ३५० च्या पल्याड तर एकट्या भाजपचे ३५२ हून अधिक उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळीकडे नरेंद्र मोदींच्या लाटेची जादू पाहण्यास मिळाली आहे.
King of Saudi Arabia, Salman bin Abdulaziz Al Saud congratulates Prime Minister Narendra Modi in a telephonic conversation. (File pic) pic.twitter.com/QAc4U3Ph6Z
— ANI (@ANI) May 24, 2019