डोनाल्ड ट्रम्प यांनी केले मोदींचे अभिनंदन!

नवी दिल्ली – सध्या भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल असून एनडीए ३५० च्या पल्याड तर एकट्या भाजपचे ३५२ हून अधिक उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाबाबत जगातल्या विवध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांकडून मोदींना विजयाचे शुभेच्छा संदेश येण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांनी सुध्या मोदींचे लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सगळीकडे नरेंद्र मोदींच्या लाटेची जादू पाहण्यास मिळाली असून, मतदारांनी भाजपच्या दिशेने कौल दिला आहे. त्यामुळे विजयानंतर भाजपच्या गोठात उत्सवाचे वातावरण दिसून येते आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1131609042227482625

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)