एचडीएफसीच्या नफ्यात 54 टक्‍क्‍यांनी वाढ

नवी दिल्ली: एचडीएफसीचा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा नफा 54 टक्‍क्‍यांनी वाढत 2,190 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत तो 1,424.47 कोटी रुपये होता. कंपनीच्या एकूण उत्पन्नात 20 टक्‍कयांनी वाढ होत 9,952 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षात समान तिमाहीत ती 8,289.98 कोटी रुपये होती. तिमाहीदरम्यान कंपनीच्या उत्पन्नात वाढ होत 9,883 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने बाहय कर्जाच्या माध्यमातून 35 हजार कोटी रुपये उभारण्यास मंजुरी दिली आहे. या ताळेबंदावर गुंतवणूकदार समाधानी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)