54 ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत

प्रत्येक इमारतींसाठी 12 लाखांचा निधी मिळणार
मुंबई – राज्यातील 54 ग्रामपंचायतींना लवकरच स्वतंत्र इमारत मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी “बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने’च्या दुस-या टप्प्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार 54 ग्रमपंचायतींना कार्यालयीन इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी 12 लाख रूपयांचा निधी मिळणार आहे.
राज्य सरकारने एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ज्या ग्रामपंचायतीला स्वत:च्या कार्यालयासाठी इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने योजना सुरू केली आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात 302 ग्रमपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. आता दुस-या टप्प्यात 12 जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.

यात नागपूर, अकोला, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एक, तर अहमदनगरश्‍ नांदेड, अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी 2, पुण्यातील 9, साता-यातील 6, हिंगोलीतील 5 आणि परभणीतील 3 ग्रमपंचायतींचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती
पंकजा मुंडे यांनी आपल्या बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश या योजनेत केला आहे. दुस-या टप्प्यात 21 ग्रामपंचायतींना कार्यालय बांधण्यासाठी निधी दिला जाणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात बीडमधील 64 ग्रामपंचायतींचा समावेश होता.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)