कारची काच फोडून दागिने, मोबाईल चोरले

लोणी काळभोरमधील घटना : कारची काच फोडून दागिने, मोबाईल चोरले

लोणी काळभोर- सर्वजण विवाहसमारंभाच्या कार्यक्रमात दंग आहेत ही संधी साधून चोरट्यांनी चारचाकी गाडीची काच फोडली. व गाडीत ठेवलेल्या पर्समधील 5 तोळे 8 ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह 2 मोबाईल असा एकूण 1 लाख 18 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री 8. 45 च्या सुमारास उघडकीस आली. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुम्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल अरूण ढमाले (वय 36, रा. तळेगांव दाभाडे स्टेशन, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ढमाले कुटुंबीय शुक्रवारी विवाहनिमित्त कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एका मंगल कार्यालयात कार (एमएच 14 ईएच 3222) मधून दुपारी दोनच्या सुमारास आले होते. त्यांनी आपली कार पार्किंगमध्ये लाऊन ते लग्नासाठी गेले होते. सायंकाळी 7.30 च्या सुमारास त्यांची बहिण पल्लवी योगेश गायकवाड (रा. टिंगरेनगर विश्रांतवाडी, पुणे) यांनी त्यांचे व भाऊ अतुलच्या मुलींचे सोन्याचे दागिने व दोन मोबाईल एका पर्समध्ये ठेवून ती पर्स गाडीतील बॅगमध्ये ठेवली. कार लॉक करून त्या पुन्हा भोजनासाठी कार्यालयात गेल्या. सर्व कार्यक्रम झालेनंतर घरी जाण्यासाठी ते सर्वजण रात्री 8. 45 च्या सुमारास कार जवळ आले त्यावेळी त्यांना कार चालकाच्या बाजूची मागील काच तुटलेली व आत ठेवलेली बॅग उचकटलेली दिसली. त्यांनी बॅगेची पाहणी केली असता त्यांना दागिने व मोबाईल ठेवलेली पर्स दिसली नाही असे फिर्यादित नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)