जिरेगावच्या सरपंचपदी भरत खोमणे

कुरकुंभ- जिरेगाव (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत मधुकर खोमणे यांची निवड झाली आहे. जिरेगाव ग्रामपंचायतीचे मतदान रविवारी (दि.24) झाले. मतमोजणी सोमवारी (दि. 25) पार पडली. यंदा प्रथमच जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत जनतेने सरपंचपदाची माळ भरत खोमणे यांच्या गळ्यात घातली आहे.

सरपंचपदाच्या आरक्षणाप्रमाणे जिरेगावचे सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव होते. या चुरशीच्या निवडणुकीत भरत खोमणे यांना 631 मते मिळाली. सदस्यपदाचे संगीता लक्ष्मण गरदडे, राणी मच्छिंद्र लाळगे, हनुमंत चंदर खंडाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजयी उमेदवारांचे नाव व मते पुढीलप्रमाणे- प्रकाश शिवाजी जाधव (332), राजेंद्र हरिभाऊ लोणकर (291), सोनबा बापुराव मचाले (289), सुनंदा मोहन भंडलकर (272), प्रतिभा सोमनाथ नरूटे (203), राणी संतोष पवार (264),

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)