पवारांच्या समोरच दोन गटात राडा

शेखर गोरे समर्थकांचा मेळाव्यात गोंधळ

सातारा  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असतानाच शुक्रवारी फलटणमध्ये त्यांच्या समोरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी उघड झाली.शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या दोन गटांमधील कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला.

हा वाद एवढा टोकाला गेला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. गोंधळामुळे शरद पवारांनाही भाषण थांबवावे लागले.पक्षाच्या या मेळाव्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर व शेखर गोरे यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे स्वत: निवडणुकीस उभे राहणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर फलटण येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता.  या मेळाव्याला शेखर गोरे यांनाही निमंत्रण होते. या बैठकीला शेखर गोरे यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माण तालुक्‍यातील अनेक नेत्यांना स्थान देण्यात आले होते.

पण शेखर गोरे मात्र कार्यकर्त्यामध्येच बसले होते.अनेकांनी आग्रह केल्यानंतरही शेखर गोरे यांनी स्टेजवर न येण्याचा निर्णय घेत खाली बसले. नेत्यांची भाषणे सुरु झाल्यावर शेखर गोरे यांच्या समर्थकांनी आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात जोरदार हल्लाबोल चढवला.जनतेमध्ये बसलेल्या शेखर गोरे व त्यांच्या समर्थकांनी कविता म्हेत्रे यांचे भाषण सुरू असताना गोंधळ घालायला सुरूवात केली. आमचा पराभव कुणी केला? याचे आधी उत्तर द्यायला सांगा अशी जोरदार मागणी या समर्थकांनी केली. त्यानंतर शेखर गोरे व रामराजे नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना जाऊन भिडले. या हाणामारीनंतर वातावरणात तणाव निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र तरीही दोन्ही गटाचे कार्येकर्ते कुणीही कुणाचे ऐकत नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेवटी पवार यांना स्वत: माईक हातात घ्यावा लागला. शेखर गोरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.तरीही बराच वेळ धुसफूस सुरु राहिली. पवार यांचे भाषण सुरू असतानाच हा गोंधळ झाल्याने एकच खळबळ उडाली. गोरे हे पवार यांचे भाषण सुरू असतानाच मंचावर गेले आणि त्यांनी पवारांना रोखत त्यांचे म्हणणे मांडण्यास सुरूवात केली. गोरे यांच्या या प्रकारासमोर सर्वचजण हतबल झाल्याचे दिसले.शरद पवारांनाही आपले भाषण थांबवावे लागले.खुद्द शरद पवारांनीही वाद सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने शरद पवार हताशपणे हा वाद पाहत राहिले.

गोरे यांनी हा अंतर्गत वाद असल्याचे म्हटले असून राष्ट्रवादीत सक्रिय झालेले प्रभाकर देशमुख यांच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. मला पवारसाहेबांपर्यंत पोहोचू दिले जात नाही. पक्षाचे आदेश मला सांगितले जात नाहीत. पण प्रभाकर देशमुख यांनी अंतर्गत राजकारणात पडू नये, असेही गोरे यांनी म्हटले. कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचे शेखर हे भाऊ आहेत. शेखर गोरे यांच्या या कृत्यावर राष्ट्रवादीकडून कारवाई केली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)