वनक्षेत्राला वणवा लावला एकास कोर्टाकडून 5000 दंड

सातारा – वनक्षेत्राला वणवा लावल्याबद्दल एकास कोर्टाकडून 5000 दंड ठोठावण्यात आला आहे. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मौजे कामथीमध्ये वणवा लागल्याबाबत समजले आसता वनपाल सातारा शंकर आवळे व वनरक्षक संजय धोंडवड तसेच वनमजुर कृष्णा पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वणवा विझविला. त्याबाबत वनपाल आवळे यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (ब)नुसार प्रथम गुन्हा रिपोर्ट नोंदविला होता.

उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे व वनक्षेत्रपाल सातारा शीतल राठोड यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल सातारा आवळे साहेब व वनरक्षक कण्हेर धोंडवड साहेब यांनी अधिक तपास केला असता चंद्रकांत भिकू शिंदे वय 71, राहणार वेळे पोस्ट कामथी यांनी वणवा लावल्याचे स्पष्ट झाले.आरोपी चंद्रकांत भिकू शिंदे यास सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 5000/- रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. सदर गुन्हेकामी वनपरिमंडळ सातारा मधील सुहास भोसले वनरक्षक सातारा,निलेश रजपूत वनरक्षक भरतगाव,प्रशांतकुमार पडवळ विशेष वनरक्षक सातारा यांनी मोलाचे सहकार्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)