जमीन खरेदीतून युवकांना 50 लाखांना गंडा

राजगुरूनगर – गोव्यातील जमीन खरेदी व्यवहारात राजगुरूनगरमधील तीन युवकांची 50 लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी तिघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास मधुकर वेद्रे (सध्या, रा. राजगुरूनगर), गुनुलू रामनाथ परब, स्वप्नील शशिकांत बेलवनकर (रा. कोटबी, ता. बिचोलीन, उत्तर गोवा), असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. मनोज चव्हाण, गणेश टाकळकर, बापूसाहेब बोंबले (तिघे रा. राजगुरूनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

रामदास वेद्रेने राजगुरूनगरमधील मनोज चव्हाण, गणेश टाकळकर, बापूसाहेब बोंबले यांच्याशी ओळख करून गोव्यात जमीन विक्रीला आहे, असे सांगितले. गुनुलू परबच्या मालकीची गोव्यातील सर्व्ह नं. 40/3 क्षेत्र 5225 स्वेअर मीटर जमीन खरेदी करण्याचे ठरले. त्यानुसार जमिनीचा व्यवहार जून 2016 पूर्वी ठरवून त्यानंतर 9 नोव्हेंबर 2018 पूर्वी तक्रारदारांनी वेळोवेळी 50 लाख रुपये धनादेश, आरटीजीएस व रोख स्वरूपात दिलेले आहेत. पूर्ण व्यवहार दीड कोटींचा ठरलेला होता. त्यापैकी इसार रक्‍कम 50 लाख रुपये जमीन मालक परब यांना देण्याचे ठरले होते. 50 लाख दिल्यानंतर इसार पावती करण्यास परबने टाळाटाळ केली. त्यामुळे खरेदीदार रामदास, स्वप्नील या मध्यस्थींना घेऊन गोव्यात गेले. त्यावेळी गुनुल परब घरदार विकून तेथून पसार झाल्याचे निदर्शनास आले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)