50 हजारापेक्षा अधिक बनावट प्रमाणपत्रे विकणाऱ्या दिल्लीतील टोळीचा पर्दाफाश

नवी दिल्ली – 50 हजारापेक्षा बनावट प्रमाणपत्रे विकणाऱ्या दिल्लीतील एका टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. देशातील अन्य भागात या टोळीची विभागीय कार्यालये आणि एजंट्‌स होते. गेल्या काही वर्षात या टोळीने विविध विद्यापीठे आणि शिक्षण मंडळांची 50 हजारापेक्षा अधिक प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिकांची विक्री केली असल्याचे पोलीसांनी सांगितले. या टोळीची वेबसाईट असून या प्रकरणी पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. पंकज अरोरा (35), पवितर सिंग (40) आणि गोपाल कृष्णन (40), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिकांच्या आधारे हजारो लोकांनी सरकारी आणि खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळवल्या असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

इयत्ता दहावीचे बनावट प्रमाणपत्र मिळाल्याची तक्रार घेऊन हरी नगर पोलीस ठाण्यात एक व्यक्ती आल्यानंतर या प्रकरणाचा सुगावा लागला. रु, दहा हजार ते काही लाख रुपये किमतीला ही टोळी देशातील सुमारे 30 नामवंत विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांची प्रमाणपत्रे आणि गुंणपत्रिकांची विक्री करत होती. हरी नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी विजेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पोलीस टीम या प्रकरणाचा तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)