50 उमेदवार परीक्षेपासून वंचित

ई-आधार प्रिंट नसल्याने बसण्यास दिला नकार
 उमेदवारांमध्ये संतापाची लाट;

पुणे – बॅंकिंग क्षेत्रातील प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या परीक्षेसाठी ई-आधारची संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणावरून उमदेवारांना बसू दिले नसल्याचा प्रकार नवले येथील एका परीक्षा केंद्रावर शनिवारी घडला. या कारणाने सुमारे 50 उमेदवारांना परीक्षेला बसता न आल्याने, उमेदवारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

-Ads-

इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सननेल सिलेक्‍शन (आयबीपीएस)मार्फत सरकारी बॅंकांमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येत आहेत. शनिवारपासून या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र नवले पुलाजवळील युवान आयटी सेंटर येथील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांकडे ई-आधारकार्डची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ई-आधारकार्डच्या कलर प्रिंटचा आवश्‍यक असलेला भाग कापून आणला होता. तर, काहींकडे आधारकार्ड होते. ई-आधारकार्डचा आवश्‍यक भाग परीक्षा केंद्रावर दाखवला असता संपूर्ण ई-आधारची प्रिंट असल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, असे उमेदवारांना सांगण्यात आले.

उमेदवार बाहेरगावावरून आले असल्याने अनेकांकडे आधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठलेही ओळखपत्र नव्हते. उमेदवारांनी विनंती करूनही त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. आधारकार्डची संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणाने परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

“आम्ही ई-आधारकार्डच्या प्रिंटमधील महत्त्वाचा भाग कापून तो लॅमिनेट करून आणला होता. त्यावर परीक्षार्थींची संपूर्ण माहिती असते. परंतु आम्हाला ई-आधारकार्डची संपूर्ण प्रिंट आणण्यास सांगितले. इतक्‍या कमी वेळात संपूर्ण प्रिंट आणणे शक्‍य नव्हते. तसेच आम्ही बाहेरगावावरून आलो असल्याने आमच्याकडे आधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठलाही पुरावा नव्हता. परीक्षेला बसू न दिल्याने आमचे संपूर्ण वर्ष वाया गेले आहे, अशी व्यथा एका उमेदवाराने मांडली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)