ड्रेसमुळे इजिप्तच्या ऍक्‍ट्रेसला 5 वर्षांची शिक्षा !

इजिप्तची राजधानी कैरोमध्ये आयोजित एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक ऍक्‍ट्रेस अशा ड्रेसमध्ये आली, की त्यामुळे तिला 5 वर्षांची शिक्षा सुनावली जाण्याची शक्‍यता आहे. रानिया युसुफ असे या ऍक्‍ट्रेसचे नाव आहे. कैरो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनिया काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. तिच्या ड्रेसमधून तिचे पाय दिसत होते. बस्स ! या एकाच गोष्टीवर इजिप्तमधील कट्टरवादी लोक नाराज झाले आणि इजिप्तमधील कायद्यानुसार सनिया युसुफला 5 वर्षांची शिक्षा सुनावली गेली.

जरी इजिप्त हा पुढारलेला देश असला तरी तेथेही पाश्‍चात्य देशांप्रमाणे महिलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जात नाही. तिने महिलांनी पाय दिसतील, अशा प्रकारचे पारदर्शक्‍ कपडे घालण्याची परवानगी नाही. मात्र फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवरून सनिया युसुफ आली तेंव्हाच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. काळ्या ड्रेसच्या नेटमधून तिचे पाय स्पष्ट दिसत होते. लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप ठेवून तिला 12 जानेवारीला खटल्याच्या सुनावणीला बोलावले गेले आहे. आखाती देशांमध्ये आता सुधारणांचे वारे वाहू लागले असले तरी अजूनही चौकटी शिथील झालेल्या नाहीत.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)