गृह मंत्रालयासाठीच्या तरतुदीत 5 टक्के वाढ 

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्पात गृह मंत्रालयासाठीच्या तरतुदीत 5.17 टक्के इतकी मर्यादित वाढ करण्यात आली आहे. त्या मंत्रालयाला 1 लाख 19 हजार कोटी रूपये इतका निधी उपलब्ध होईल. तो निधी उपलब्ध करताना पोलीस दलांचे आधुनिकीकरण तसेच सीमाभागांत पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे.

देशाच्या राजधानीमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सांभाळणाऱ्या दिल्ली पोलिसांसाठी 7 हजार 496 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. निमलष्करी दलांचा विचार करता केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) सर्वांधिक 23 हजार 963 कोटी रूपये उपलब्ध करण्यात आले आहेत.

त्याखालोखाल सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) 19 हजार 650 कोटी रूपये मिळतील. सीआरपीएफ, बीएसएफ यांच्यासह सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी मिळून 91 हजार 713 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुप्तचर विभागासाठीच्या (आयबी) तरतुदीत 300 कोटी रूपयांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. आयबीला 2 हजार 384 कोटी रूपये निधी मिळेल. निर्भया फंड या महिला सुरक्षेशी संबंधित योजनेसाठी 50 कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)