बांधकाम सुरु असलेल्या मालमत्तांवर 5 टक्के जीएसटी

नवी दिल्ली:  वस्तू आणि सेवा कर अर्थात “जीएसटी’च्या रविवारी झालेल्या बैठकीमध्ये बांधकाम सुरु असलेल्या मालमत्तांवरील कर सध्या अस्तित्वात असलेल्या 12 टक्के ऐवजी 5 टक्के करण्यात आला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.

परवडणाऱ्या घरांवर सध्या लागू असलेल्या 8 टक्के करांचे प्रमाण 1 टक्‍क्‍यापर्यंत कमी करण्यात आले आहे. मेट्रो शहरांमध्ये 60 चौरस मीटर आणि बिगर मेट्रो शहरांमध्ये 90 चौरस मीटर परिसर असलेल्या परवडणाऱ्या घरांच्या किंमतींची मर्यादा 45 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. करांचे हे नवीन दर 1 एप्रिल 2019 पासून अस्तित्वात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र “जीएसटी’च्या नवीन दरांनुसार बांधकाम व्यवसायिक “इनपुट टॅक्‍स क्रेडिट’ (आयटीसी)साठी दावा करू शकणार नाहीत. सध्या बांधकाम सुरु असलेल्या मालमत्तांच्या पेमेंटवर किंवा विक्रीच्या वेळी बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र न दिल्या गेलेल्या तयार सदनिकांच्या किंमतींवर 12 टक्के “जीएसटी’ची आकारणी केली जाते.

मात्र विक्रीच्यावेळी बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले गेलेल्या मालमत्तांवर “जीएसटी’ आकारण्यात आलेला नाही. “जीएसटी’च्या या कपातीमुळे बांधकाम क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळेल, अशी आशा जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केली.

लॉटरीवर “जीएसटी’लागू करण्याचा निर्णय मात्र पुढे ढकलण्यात आला. या संदर्भातील प्रस्तावावर मंत्रीगटाच्या बैठकीमध्ये विचार केला जाईल, असे जेटली यांनी सांगितले. सध्या राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या लॉटरीवर 12 टक्के “जीएसटी’आकारला जातो. तर राज्य सरकारांची मंजूरी असलेल्या लॉटरीवर 28 टक्के “जीएसटी’आकारला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)