उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ५ जणांची माघार तर १४ उमेदवार रिंगणात

उस्मानाबाद – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण २३ जणांनी ३७ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

अतुल विक्रम गायकवाड (अपक्ष), अर्चना राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), काकासाहेब बापूराव राठोड (अपक्ष), नवनाथ दशरथ उपळेकर (अपक्ष), बसवराज गुरुलिंगप्पा वरनाळे (अपक्ष), या उमेदवारांनी आपली  उमेदवारी मागे घेतली आहे.

त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत.

त्यांची नावे पुढील प्रमाणे –

राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर (शिवसेना), अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी), डॉ.शिवाजी पंढरीनाथ ओमान (बहुजन समाज पक्ष), दीपक महादेव ताटे (भापसे पक्ष), अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल), विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (क्रांतिकारी जयहिंद सेना), तुकाराम दासराव गंगावणे  (अपक्ष), जगन्नाथ निवृत्ती मुंडे (अपक्ष), सय्यद सुलतान लडखान (अपक्ष), डॉ.वसंत रघुनाथ मुंडे (अपक्ष), नेताजी नागनाथ गोरे (अपक्ष), शंकर पांडुरंग गायकवाड (अपक्ष), आर्यनराजे किसनराव शिंदे(अपक्ष).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)