डेटा लिक प्रकरणी फेसबुकला 5 अब्ज डॉलर्सचा दंड : टेक कंपनीवरील दंडाची सर्वात मोठी रक्कम

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनने डेटा लिक प्रकरणी फेसबुकला 5 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. कोणत्याही टेक कंपनीवरील दंडाची ही सर्वात मोठी रक्कम असणार आहे. यापूर्वी 2012 मध्ये गुगलला 154 कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. फेसबुकवरील दंडाच्या शिफारसीवर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मार्च 2018 मध्ये फेसबुकच्या डेटा लिकचे सर्वात मोठे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर एफटीसीने फेसबुकला युझर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षेतील दोषी ठरवले होते.

ब्रिटनमधील कंसल्टन्सी फर्म केंब्रिज ऍनालिटीकाला डेटा लिक करण्याच्या प्रकरणात फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेतील संसदेत हजर करण्यात आले होते. त्यानंतर एफटीसीने फेसबुक विरोधात तपास सुरू केला होता. त्यानंतर आपल्या विरोधात तपास सुरू झाल्यानंतर फेसबुकने 3 ते 5 अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर एफटीसीने या प्रकरणाचा तपास संपवण्यासाठी कंपनीवर ठोठावण्यात येणऱ्या दंडाची रक्कम निश्‍चित केली. दंडाची रक्कम ही फेसबुकला मिळालेल्या महसूलाच्या केवळ 9 टक्के इतकी आहे. केंब्रिज ऍनालिटीकाने फेसबुकच्या 8.7 कोटी युझर्सचा डेटा मिळवला होता. तसेच या डेटाचा उपयोग कंपनीने 2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)