आज पुन्हा वादळासह पावसाची शक्यता
अकोले तालुक्यात सर्वाधिक पाऊस
नगर – हावामान खात्याने वर्तवलेल्या आंदाजानुसार जिल्ह्यात ठिक-ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक अकोले तालुक्यात 120 मिलीमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ राहाता, कोपरगाव,नगर, शेवगाव, राहुरी तालुक्यात वादळी पावसाचा शिडकाव पडला. जिल्ह्यात 5.17 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून बुधवार रोजी देखील वातावरण असेच राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नाशिक, पुणे व नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळांसह पावसाची शक्यता हावामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार उत्तर मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. विजांचा कडकडाटसह अकोले तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याध्ये 120 मिलीमीटर पाऊस हा अकोले तालुक्यात पडला आहे. तसेच नगर येथील सावेडी महसूल मंडलात आकोले पाठोपाट 58 मिलीमिटर पाऊसाची नोंद झाली.
शहरात पाऊसाचे आगमन सोमवारी दुपारी दोन वाजता झाले. वादळी पावसामुळे नगर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली. तर महावितरण विभागाचे खांब पडले. रविवारी, सोमवार रोजी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अकोले तालुक्यातील राजूर, अकोले, शेंडी, ब्रम्हाणवाडा, समशेरपूर, कोतूळ व साकीरवाडी महसूल मंडळात पाऊसाची नोंद झाली. तर नगर तालुक्यातील सावेडी, नालेगाव, कापूरवाडी, केडगाव, चास, भिंगार, नागापूर व चिचोंडी पाटील परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. कोपरगावासह पोहेगाव, सुरेगाव व दहिगाव बोलका या गावात पावसाचा शिडगाव पडला. बुधवारी देखील वातावरण असेच राहील, असा इशारा हवान विभागाने दिला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.