5 लाख चिनी नागरिकांसाठी पाकिस्तानात बनतेय खास शहर

बीजिंग (चीन) – पाच लाख चिनी नागरिकांसाठी चीन पाकिस्तानमध्ये एक खास शहर वसवत आहे. हे शहर पाकिस्तानच्या ग्वादर भागात बनत आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान जरी देश बदलण्याच्या आणि आर्थिक सुधारणाच्या गोष्टी सांगत असले, तरी चीन पाकिस्तानवर हळूहळू कब्जा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे हे सत्यच आहे. याचे एक प्रत्यंतर म्हणजे पाच लाख चिनी नागरिकांसाठी चीन वसवत असलेले हे नवीन शहर. या शहरात फक्त चिनी नागरिकच राहू शकणार आहेत.

अशा प्रकारची शहरे चीनने आफ्रिका आणि मध्य एशियामध्ये वसवलीच आहेत. पूर्व रशिया आणि म्यान्मारमध्ये चीन जमीन खरेदी करत असल्याचे आरोप केले जात आहेत. आणि या गोष्टीवरून स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. पाकिस्तानमधील हे चिनी शहर सीपीईसीचा (चीन पाकिस्तात इकॉनॉमिक कॉरिडॉर) एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. एशिया खंडातील चीनची अशा प्रकारची हे पहिलीच कॉलनी आहे.

सन 2022 पर्यंत पूर्ण होणाऱ्या आणि सीपीईएसीचा भाग असणाऱ्या या शहरात सुमारे पाच लाख घरे बांधली जात आहेत. सीपीईसी परियोजना पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात असल्याने भारताचा या योजनेला विरोध आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी बीजिंगमधील वन बेल्ट वन रोड शिखर परिषदेत भारताने भाग घेतला नव्हता. या परिषदेत अमेरिका आणि जपानसह अनेक एशियाई देशांनी भाग घेतला होता.

ग्वादर बंदराचे काम चिनी कंपन्याच करत असून सीपीईसी परियिजनेसुसार चीनला त्या भागात एका वित्तीय जिल्ह्याची स्थापना करायची आहे. सीपीएसी अंतर्गत पाईपलाईन्स, रेल्वे, हायवे आदी 39 प्रकल्पांपैकी 20 प्रकल्प पूर्ण झाले आहेत वा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)