5 मे रोजी हरियाणात 401 व्यायामशाळांचे उद्घाटन – मुख्यमंत्री खट्टर

पानिपत (हरियाणा) – दिनांक 5 मे रोजी हरियांणात 401 व्यायामशाळांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले आहे. या सर्व व्यायामशाळा प्रत्येकी सुमारे दोन एकर जमिनीवर तयार करण्यात आलेल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात ऐकल्यानंतर बाबली गावातील लोकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये हरियांणाचा खास उल्लेख केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अलीकडेच ऑस्ट्रेलियात संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 66 पदके जिंकली आहेत. आणि या 66 पैकी 22 पदके हरियांणाच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. केवळ 15 वर्षे वयाच्या अनिश भनवालाने सुवर्णपदक जिंकले आहे. हरियाणाच्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेत तिसरा क्रमांक आला असे यांनी अभिमानाने संगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक पदके जिंकावीत या हेतून हरियांणा सरकार खेळांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देत आहे. फिट इंडिया योजनेखाली हरियाणा सरकार स्पोर्टस नर्सरी सुरू करणार आहे. 6 ते 15 वर्षे वयाच्या मुलांना त्यात त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)