खूनाच्या गुन्हयात जामीनावर सुटलेल्यांकडून 5 पिस्तूल व 16 काडतूसे जप्त

पुणे- खुनाच्या गुन्हयात जामीनावर सुटलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांकडून 5 पिस्तूल व 16 काडतूसे हस्तगत करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हौसेखातर पिस्तूल विकत घेणाऱ्या ट्रांन्सपोर्ट व्यवसायीकालाही दरोडा प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्याची आय 20 कारही जप्त करण्यात आली आहे.

नितीन सुधाकर अवचिते(30,रा.हरणेश्‍वर, ता. मावळ), मयुर रामदास सुतार(29,रा.वडगाव मावळ) आणि सागर बबन गोळे(नवी मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.
यातील नितीस व मयुर यांच्यावर वडगाव मावळ येथे 2011 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये ते सहा महिन्यातच जामीनावर सुटले होते. दरोडा प्रतिबंधक पथकाला हे दोघे पिस्तुल घेऊन संगमवाडी येथील ट्रॅव्हल बस पार्किंगजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दोन पथके तयार करुन सापळा रचला. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळ दोन गावडी बनावटीचा पिस्तुल आणि 13 काडतूसे असा 82 हजार 600 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांच्याविरुध्द येरवडा पोलिस ठाण्यात आर्म ऍक्‍टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी सागर गोळे यास तीन पिस्तुल विकल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सागर गोळे यास मुंबई-पुणे महामार्गावरील हॉटेल हिल व्हयू येथे रविवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कारची झडती घेतली असता गाडीच्या डॅश बॉक्‍समध्ये तीन पिस्तुल व तीन काडतुसे असा 1 लाख 20 हजार 600 रुपयांचा तर कारसह 9 लाख 20 हजार 600 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यातील आरोपी नितीन विरुध्द खुनाचा व आर्म ऍक्‍टसह चार गुन्हे दाखल आहेत. तर मयुर याच्याविरुध्द खुन व आर्म ऍक्‍टसह गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. सागर गोळे हा ट्रांन्सपोर्ट व्यवसायीक असून हौसेखातर पिस्तुल विकत घेतल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलिस उपनिरीक्षक संजय दळवी, पोलिस कर्मचारी यशवंत आंब्रे, विनायक पवार, शंकर पाटील, निलेश पाटील, राहुल घाडगे, दत्तात्रय काटम, विलास कांबळे, बशीर सय्यद, परवेज जमादार, प्रमोद गायकवाड, महेश कदम, मल्लिगार्जुन स्वामी, सचिन गायकवाड, रामदास गोणते, विल्सन डिसोझा, धनाजी पाटील, व प्रविण जाधव यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)