5 दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 करा : राज्यातील दिड लाख राजपत्रिक अधिकाऱ्यांची मागण

5 जानेवारीला एक दिवसाचा संप

मुंबई: राज्य सरकारने सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याचे आश्वासन दिल्यानंतर 5 दिवसांचा आठवडा आणि सेवानिवृत्तीचे वय 60 करा, या प्रलंबित मागणीसाठी राजपत्रित अधिकारी ठाम असून त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यासाठी येत्या 5 जानेवारी रोजी राज्यभरातील सुमारे दिड लाख राजपत्रित अधिकारी संपावर जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवासुविधा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु आहे. महासंघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिले होते. केंद्रात राज्याप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय साठ करावे, सर्व रिक्त पदे भरण्यात यावी या प्रमुख मागण्या आहेत. राज्यात सातवा वेतन आयोग लागू करताना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचे आश्वासन दिले होते याची आठवण यावेळी संघटनेने करून दिली आहे. पण आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.

त्यामुळे अधिकारी वर्गात नाराज आहे. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी अधिकारी तसेच मंत्रालयासह सर्व सलग्न संघटनांकडून दबाव आहे. मागण्या मान्य न झाल्यास सामुहिक नैमित्तिक रजा आंदोलन पुकारण्यावर अधिकारी वर्ग ठाम आहे. त्यामुळे अधिकारी महासंघाने 5 जानेवारी रोजी राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकारी सामुहिक रजेवर जातील असा इशारा महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे व अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)