चेक बाऊन्सच्या एका प्रकरणामध्ये कडकडडूमाच्या न्यायालयाने अभिनेता राजपाल यादवला दोषी ठरवले आहे. या प्रकरणी राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला 23 एप्रिलला शिक्षा सुनावली जाणार आहे. या दोघांना कर्जबुडवेगिरीच्या तब्बलसात प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.
मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राजपाल आणि त्याच्या पत्नीविरोधात तक्रार केली होती. राजपाल आणि त्याच्या पत्नीने 2010 मध्ये “आता पता लापता’ नावाची फिल्म पूर्ण करण्यासाठी मुरली प्रोजेक्ट प्रा.लि. या फायनान्स कंपनीकडून अर्थसहाय्य घेतले होते. 30 मे 2010 रोजी या संदर्भातील 5 कोटी रुपयांच्या कर्जाचा करार झाला होता. या करारानुसार राजपाल यादवला 5 कोटी रुपयांचे मुद्दल आणि त्यावरील व्याज मिळून 8 कोटी रुपयांची परतफेड करायची होती.
मात्र त्याला ही परतफेड करता आली नाही. त्यानंतर तीनवेळा कराराचे नुतनीकरण करण्यात आले. 2012 मध्ये 11 कोटी रुपयांची परतफेड करण्याचा अंतिम करार झाला होता. मात्र तो करारही राजपाल यादवला पाळता आला नाही. म्हणून त्याच्यावर कर्जबुडवेगिरी प्रकरणी केस ठोकण्यात आली होती.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा