5जी सेवेसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणार 

मुंबई – मोबाइल तंत्रज्ञान झपाट्याने 5जीकडे जात आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे येत्या काळात रोजगार जाऊ नये यासाठी किरकोळ सीमकार्ड विक्रेत्यांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार दूरसंचार कौशल्य विकास परिषदेची स्थापना करणार आहे. यासाठी आवश्‍यक 5 जी धोरण जूनमध्ये आणले जाईल, अशी घोषणा केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी केली.

ब्रॉडबॅण्ड इंडिया फोरम (बीएफआय) व बीएसएनएलतर्फे आयोजीत 5जी संबंधी परिषदेत मनोज सिन्हा म्हणाले की, 5जी साठी सरकारने जोमाने तयारी सुरू केली आहे. या संदर्भातील धोरणाच्या मसुदा तयार करण्यासाठी मोबाइल कंपन्या व तज्ज्ञांकडून सूचना मागविल्या जात आहेत. सरकारने यासंबंधी अभ्यास सुरू केला आहे. जूनमध्ये हे धोरण आणले जाईल.

याआधीच्या 3जी, 4जी यांची सुरुवात जगभरात झाली त्यानंतर तंत्रज्ञानाचा अवलंब भारताने केला. पण 5जीचे केंद्र आता भारत असेल. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. या तंत्रज्ञानामुळे रोजगाराला कुठल्याही स्थितीत फटका बसू दिला जाणार नाही. भारतात इंटरनेटचा वापर 500 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची उभारणीही मोठ्या प्रमाणात करावी लागेल. त्यासाठी मोबाइल टॉवर्सची संख्या दुप्पट करावी लागेल. एकदा धोरण आले की या सर्व बाबी स्पष्ट होतील, असे त्यानी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)