5जी सेवा सुरू करण्याची तयारी वेगात 

नवी दिल्ली: भारतात 2022 पर्यंत उच्च गती असलेली अत्याधुनिक 5जी दूरसंचार सेवा सुरू होईल, असे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. सुंदराजन यांनी म्हटले की, 2022 पर्यंत 5जी सेवा पूर्णांशाने सुरू होईल. ही सेवा पुरवठ्यावर आधारित नसेल. ती मागणीवर आधारित असेल. इतर उद्योगांनी त्यादृष्टीने तयारी करायला हवी.
दूरसंचार सेवेचे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या बाबतीत भारत आतापर्यंत अन्य देशांच्या तुलनेत पिछाडीवर होता. 4जी सेवा भारतात खूप उशीर आली परंतु 5जीच्या बाबतीत फार उशीर होणार नाही. दक्षिण कोरिया, जपान व चीन यासारख्या देशांचा येत्या दोन वर्षांत 5जी तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आहे. भारत त्यांच्या पाठोपाठ असेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
सॅनफोर्ड सी. बर्नस्टीनचे हॉंगकॉंगस्थित विश्‍लेषक क्रिस्टोफर लेन म्हणाले की, दक्षिण कोरियात मार्च 2019 मध्ये, जपानमध्ये 2019 च्या अखेरीस; तर चीनमध्ये 2020 मध्ये 5जी सेवा सुरू होईल. भारतात दोन वर्षे उशीर होत असला तरी ते पथ्यावर पडणारेच ठरेल. तोपर्यंत 5जी हॅंडसेटच्या किमती कमी झालेल्या असतील. 5 जीमुळे संपर्क व्यवस्थेत क्रांती होईल. ऊर्जेचा कमी वापर, डाऊनलोडसाठी प्रचंड गती आणि क्षमताही त्यात असेल. स्वयंचलित वाहने, ड्रोन, रिमोटच्या मदतीने शस्त्रक्रिया आणि वाहतूक नियंत्रण या क्षेत्रातही 5जीचा वापर होईल.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)