चौथा कसोटी सामना – दुसरा डाव, इंग्लंड ८बाद  २६० 

साऊथहॅम्पटन – भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडने  ८बाद २६० धावांपर्यंत  मजल मारली. काल दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद 6 धावा केल्या होत्या. सॅम करन ३७ धावांवर खेळात आहे.

त्याआधी भारताचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत नाबाद 132 धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला डावाअखेरीस केवळ 27 धावांची आघाडी मिळवता आली होती.

भारतीय गोलंदाजांनी  इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचे काम नियमित अंतराने केल्याने  दिवसाअखेर इंग्लंडचा संघ  ८बाद २६० धावा करू शकला. भारतासाठी मोहंमद शमीने ३ बळी  घेतले तर ईशांत शर्माने २ बळी घेतले. बुमराह आणि अश्विन यांना एक बळी मिळाला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट धावचीत झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)