बारामतीत स्वच्छतेची व्याप्ती वाढतेय

मोहिमेच्या दुसऱ्या भागात प्रभाग 18 चकाचक : नगसेवकांचा उपक्रम

बारामती- नववर्षाचे स्वच्छतेच्या मध्येमातून स्वागत केल्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित साधून बारामती नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी स्वच्छता मोहीमेचा दुसरा भाग हाती घेतला. यामध्ये शहरातील प्रभाग 18मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नगरसेवकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
शहराच्या स्वच्छतेचा संकल्प सोडत नगरसेवकांनी नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले होते. वेगवेगळ्या प्रभागात 52 आठवडे स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे नगरसेवकांनी त्यावेळी जाहीर केले होते. त्यानुसार स्वच्छतेचे कामकाज सुरू असून या अभियानातील दुसऱ्या आठवड्यात प्रभाग क्रमांक 18 मध्ये उर्वरित भागाची स्वच्छता करण्यात आली. नगरसेवकांनी सुरू केलेल्या या या उपक्रमास राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला तसेच उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छता देखील केली. या उपक्रमाचे स्वागत करत नागरिकांनी देखील सहभाग घेतला. जुनी भाजी मंडई, खाटीक, कसाब गल्ली, बालक मंदिर परिसर, वस्ताद शंकर भोई तालीम परिसरातील स्वच्छता करण्यात आली. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे सफाई कामगार तसेच महालक्ष्मी उद्योगसमूहाच्या सफाई कामगारांच्या माध्यमातून ही साफसफाई करण्यात आली. स्वच्छतेमुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 हा स्वच्छ व सुंदर होत आहे. नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव नगरसेवक यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या उपक्रमात नगरसेवक सत्यव्रत काळे, संतोष जगताप, गणेश सोनवणे, नवनाथ बल्लाळ, अमर धुमाळ, कुंदन लालबिगे, माजी नगरध्यक्ष व शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक सुधीर सोनवणे तसेच सिद्धनाथ भोकरे, अल्ताफ सय्यद यांनी सहभाग घेतला.

  • 52 आठवडे स्वच्छता मोहीम या उपक्रमाची सुरुवात 2019 या नववर्षात करण्यात आली . उपक्रमातील दुसऱ्या आठवड्यात प्रभाग क्रमांक 18 मधील काही भागातील स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता मोहिमेत दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याची व्याप्ती वाढत आहे. नगरसेवकांनी एकत्र येऊन शहराच्या स्वच्छतेचा निर्धार केला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे.
    – सचिन सातव, गटनेते, बारामती नगरपरिषद

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)