वाकीत भरधाव वाहनाने एकास चिरडले

महाळुंगे इंगळे- भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका 55 वर्षीय अनोळखी व्यक्‍तीस चिरडल्याचा धक्कादायक प्रकार पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी बुद्रुक (ता. खेड) गावच्या हद्दीत बुधवारी (दि. 9) रात्री नऊच्या सुमारास घडला. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनाससह पसार झाला. त्यामुळे चाकण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्णवाहिका चालक बाबासाहेब राजाराम पोटवडे (वय 35, रा. काळूस, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. मृत व्यक्‍तीच्या अंगावर काळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, नेसणीस काळ्या रंगाची पॅंट, डोक्‍याचे केस पांढरे आहेत. त्याच्या जवळ ओळखीचा असा कोणताही पुरावा सापडला नसल्याने अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)