490 कोटींच्या कर थकबाकीदारांची नावे जाहीर

नवी दिल्ली – प्राप्तीकर विभागाने आज 490 कोटी रुपयांच्या करांची थकबाकी असलेल्या 24 करदाते आणि कंपन्यांची नावे जाहीर केली. हे करबुडवे एकतर बेपत्ता आहेत किंवा त्यांच्याकडे करांच्या रकमेपेक्षा कमी मालमत्ता असल्याने करवसुली केली जाऊ शकत नाही. प्राप्तीकर विभागाने आज प्रमुख दैनिकांमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध करून या करदात्यांची नावे जाहीर केली. या जाहिरातीतील नोटीशीतूनच या व्यक्‍ती आणि कंपन्यांना करांची थकबाकी ताबडतोब भरण्याची सूचना केली गेली आहे.

या जाहिरातीमध्ये करांची थकबाकी असलेल्या व्यक्‍ती, कंपन्या, भागीदार आणि संचालकांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीचा स्थापना दिनांक, कायम खाते क्रमांक “पॅन’ किंवा “टॅन’, अखेरचा माहित असलेला पत्ता, थकबाकी असलेली करांची रक्कम, कर आकारणीचे वर्ष आणि प्राप्तीकर अधिकाऱ्यांचे संबंधित कार्यक्षेत्र आदी माहिती देण्यात आली आहे. या थकबाकीदारांमध्ये अन्न प्रक्रिया, सराफा व्यावसायिक, सॉफ्टवेअर, रिअल इस्टेट, मद्य व्यवसायिक आणि धातू उद्योगातील उत्पादकांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक 86.27 कोटी रुपयांची थकबाकी दिल्लीतील एमएस स्टॉक गुरू, इंडिया आणि कंपनीचे भागीदार लोकेश्‍वर देव यांच्याकडे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)