मुंबई: मुंबई महानगरीत आगीच्या अनेक घटना वारंवार घडत असून गेल्या दहा वर्षात मुंबईत आगीच्या एकूण 49 हजार 391 घटना घडल्या असून त्यात सहाशेच्यावर लोकांचे बळी गेले आहेत अशी माहिती राज्य सरकारतर्फे आज विधीमंडळात देण्यात आली. नगर विकास खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की सन 2008 ते 2018 या काळात मुंबईत आगीच्या ज्या एकूण घटना घडल्या त्यात वीजेच्या उपकरणांमुळे लागलेल्या आगीच्या घटनांची संख्या सर्वात मोठी म्हणजे 33 हजार 946 इतकी आहे. गॅस लिक झाल्याने आग लागल्याचे एकूण 1116 प्रकार घडले आहेत आणि 14329 प्रकार अन्य कारणांमुळे घडले आहेत. या सर्व घटनांमध्ये मिळून एकूण 609 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आगीत एकूण 110 कोटी 42 लाखांचे नुकसान झाले आहे. या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा