जेएनव्हीत पाच वर्षात 49 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बजाविली नोटीस

नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यालयात सन 2013 ते 2017 या काळात एकूण 49 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना नोटीस जारी केली आहे. या विषयाची माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यानंतर मानवाधिकार आयोगाने त्याची स्वताहून दखल घेत ही नोटीस जारी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येत्या सहा आठवड्यांच्या आत ही माहिती देण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. यातील बहुतांशी आत्महत्या वस्तीगृहाच्या आवारातच झाल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये काही दलित विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या विद्यालयात ग्रामीण भागातील अनेक मागास समाजाचे विद्यार्थी प्रवेश घेत असतात. त्यांच्या हिताची जपणूक करण्याचे काम प्रशासनानेही केले पाहिजे आणि संबंधीत मंत्रालयानेही या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे, अशी अपेक्षाही मानवाधिकार आयोगाने व्यक्‍त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)