वर्कआऊट करताना सलमान जखमी

“कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनमध्ये कपिलच्याच विनंतीवरून सलमान गेस्ट म्हणून आला. यावेळी त्याने खूप हास्यविनोद आणि मस्ती केली. पण तो सारखा आपल्या बरगड्यांवर हात ठेवत असल्याचे दिसत होते. त्याचे कारणही त्याने लगेचच सांगितले. सध्या तो “भारत’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याचसाठी वर्कआऊट करत असताना तो थोडा जायबंदी झाला. पुश अप्स मारत असताना त्याच्या बरगड्यांना जोरात हिसका बसला आणि त्यामुळे त्याला हसतानाही त्रास होत होता. याच कार्यक्रमादरम्यान सलमानचे भाऊ अरबाझ आणि सुहैल खानही आले होते.

सलमान ऑनस्क्रीन हिरोईनला किस का करत नाही, याचे कारणही अरबाझने सांगितले. याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागात सलमानचे पप्पा सलीम खान हे देखील आले. ते येणार असल्यानेच सलमानने “आता अरबाझ आणि सुहैल यांची बोलती बंद होईल.’असे सांगितले आणि पुढे बोलू दिले नाही. सलमानच्या फिमेल फॅन्सची संख्या खूप असल्याने खास आग्रहास्तव “दिल दिया गल्ला’ या रोमॅंटिक गाण्यावर त्याने परफॉर्मन्सही केला. आता त्याला झालेल्या दुखापतीच्या वेदना तो विसरूनही गेला होता. मात्र थोडी विश्रांती तर त्याला घ्यायला लागणारच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)