चारचाकी गाडीतील अडीच लाखांचे दागिने पळविले

एमबीबीएसची परीक्षा देण्यासाठी आल्यानंतर घडली घटना

लोणी काळभोर- 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे साडेदहा तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स कारमध्ये ठेवून हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी कारच्या दरवाजाची काच तोडून लांबविली. ही घटना रविवार (दि. 6) रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी धनंजय जगन्नाथ कोकाटे (वय 50, रा. अंबेजोगाई, ता. अंबेजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटे यांची मुलगी रेणुका हिची एमबीबीएसची परीक्षा पुणे, नवले ब्रीज येथील आयडॉल बिझनेस सेंटर येथे होती. त्यामुळे ते आपली स्विफ्ट कार क्रमांक (एमएच 44 जी- 6100) मधून मुलगी रेणुका, पत्नी अस्मिता, मुलगा पृथ्वीराज व भाचा गजानन यांच्यासमवेत दुपारी तीनच्या सुमारास पुणे येथे आले होते.
परीक्षा झाल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास ते सर्वजण पुन्हा घरी जाण्यासाठी पुणे येथून निघाले. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत आले. जेवण करण्यासाठी ते हॉटेल तोरणा मटन खानावळ येथे थांबले. त्यावेळी त्यांनी आपली चारचाकी हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली होती. जेवण झाल्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते गाडीजवळ आले. त्यावेळी त्यांना गाडीच्या डाव्या बाजूला असलेल्या दरवाजाची लहान काच तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यावेळी अस्मिता कोकाटे यांनी आपल्या पतीस जेवणासाठी जाताना गाडीच्या मागील आसनावर आपण सोन्याचे दागिने असलेली काळ्या रंगाची लेदरची पर्स ठेवली होती, असे सांगितले. सर्वांनी या पर्सचा शोध गाडीत व इतरत्र घेतला. परंतु ही पर्स मिळाली नाही. त्यांनी 1 लाख 25 हजार रुपये किमतीचा 5 तोळे वजनाचा चंद्रहार, 1 लाख रुपये किंमतीचे 4 तोळे वजनाचे गंठण, 40 हजार रुपये किंमतीची दीड तोळे वजनाची चेन, असा एकूण 2 लाख 65 हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले हे करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)