कोयना धरणात 48 टीएमसी पाणीसाठा

सातारा – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी कमी झालेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुन्हा एकदा जोर धरला आहे. रात्रभर संततधार पडणाऱ्या पावसामुळे गेल्या चोवीस तासात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठा तब्बल 3.28 टीएमसीने वाढला असून 45 टक्के धरण भरले आहे. तर जलाशयातील पाण्याची आवकही वाढली असून प्रतिसेकंद 27 हजार 383 क्‍युसेक्‍स पाण्याची आवक धरणात होत आहे. धरणात सध्या 48 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, पाटणसह परिसरातही मंगळवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. तसेच नद्यांच्या पाणीपातळीतही कमालिची वाढ झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच सुरूवात केली आहे. अधून मधून पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी रात्रीच्या वेळेस दमदार पावसाला सुरूवात होत आहे. सोमवारी कमी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा आपले रौद्ररूप दाखवण्यास सुरूवात केली असून मंगळवारी रात्री आणि दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे नवजा येथील ओझर्डे धबधबाही पूर्ण क्षमतेने ओथंबून वाहू लागला आहे. कोयना धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या नवजा, मानाईनगर, डिचोली या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)