नोएडात 474 मद्यपींना अटक

नोएडा – मद्यपान करून वाहन चालविणे आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 474 जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई शनिवारी रात्री नोएडा परिसरात करण्यात आली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मद्यपींचे धाबे दणाणले आहेत.

नोएडा शहरासह परिसरामध्ये पोलिसांकडून दारु विरोधी मोहिमेअंतर्गत सायंकाळी साडेसात वाजल्यापासून विशेष मोहिम राबविण्यात आली. या अभियानांर्तगत शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत तपासणी केली.

या कारवाईत नोएडा शहरातून 242 जणांना, तर अन्य 233 जणांना ग्रामीण भागातून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गौतम बुद्धनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)