पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

“मजिठिया’च्या अंमलबजावणीबाबतही शासन निरुत्साही

महाबळेश्‍वर – पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र आंदोलने करण्यात आली. महाबळेश्‍वर व पाचगणी पत्रकार संघांच्यावतीने महाबळेश्‍वर तहसिलदार कार्यालयात पत्रकारांच्या मागण्यांबाबतचे निवेदन प्र. नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांच्यासह महाबळेश्‍वर पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे याना देण्यात आले. यावेळी तालुक्‍यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाकडून पत्रकार संरक्षण कायद्याची केवळ घोषणा झाली असून अद्याप या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय जाचक अटीशिवाय सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड मिळाले पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शनची घोषणा झाली पण अजून त्याचीही अंमलबजावणी नाही. छोट्या वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरात धोरणात बदल करून ती छोटी वृत्तपत्रे बंदच होतील अशा पध्दतीन धोरण आखले जात आहे, त्याचा मोठा फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसणार आहे.”मजिठिया’च्या अंमलबजावणी बाबतही शासनाची उत्साही भूमिका नाही.

सरकार घोषणा करते पण अंमलबजावणी करत नसल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यासह राज्यात पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत आंदोलने झाली आहेत. केवळ घोषणा होते. मात्र अंमलबजावणी होत नाही. महाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या मागण्यांचा विचार करुन तत्काळ त्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा, भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल याची सरकारने नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन सोमवार 26 नोव्हेंबर रोजी महाबळेश्‍वर व पांचगणी पत्रकार संघाच्यावतीने महाबळेश्‍वर तहसीलदार प्र. निवासी नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांच्यासह पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जेष्ठ पत्रकार बबनराव ढेबे, रमेश पल्लोड, संजय दस्तुरे, महाबळेश्‍वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित खुरासणे, सचिन भिलारे, सचिन शिर्के, लहू चव्हाण, रविकांत बेलोशे, प्रेषित गांधी, दिलीप पाडळे, अभय हवलदार आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)