पुणे – खडकवासला धरण 100 टक्के भरल्यानंतर आता पानशेत धरणही 51 टक्के भरले आहे. दरम्यान खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधे मिळून एकूण 13.43 टीएमसी म्हणजे 46.07 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधून पाणीसाठा करण्यात येतो. सध्या या धरणात समाधानकारक पाणीसाठा जमा झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील दोन दिवसांपासून चारही धरणांच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. रविवारी दिवसभरात खडकवासला धरणात 0 मिमी, पानशेतमध्ये 5 मिमी, वरसगावमध्ये 5 मिमी आणि टेमघरमध्ये 7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
खडकवासला धरणात 1.97 टीएमसी, पानशेतमध्ये 5.41 टीएमसी, वरसगावमध्ये 5.05 टीएमसी आणि टेमघर धरणात 0.86 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.