धनगर आरक्षणाचा तिढा मुख्यमंत्री सोडवणारच

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला विश्‍वास

रेडा- धनगर समाज उपेक्षित असुन आपली उपजीविका करण्यासाठी भटकत असतो, जीवनाचा खऱ्या अर्थाने खडतर प्रवास करताना, आपली संस्कृती जपत, गजेढोल पारंपरिक नुत्य कला धनगर समाजाने जपली आहे. याच समाजाच्या जिवावर राज्याचा मंत्री झालो म्हणून समाजाला कधीही विसरणार नाही. धनगर आरक्षणाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सोडवणार आहेत, असे अभिवचन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
राज्यातील धनगर समाजाचे आराध्य दैवत बाबिर देवस्थानच्या यात्रा महोत्सवात गजढोल नुत्य स्पर्धा व धनगर समाजाचा महामेळाव्यात मंत्री प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी सभापती प्रविण माने यांनी बाबीर देवस्थानच्या विकास कामासाठी 6 कोटी 92 लाखांचा निधी दिल्याने मंत्री प्रा. शिंदे याच्या हस्ते माने यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर, भाजपाचे इंदापुर शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे यांच्यासह धनगर समाजातील नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले की, धनगर समाज पारंपरिक व संस्कृती जपणारा आहे. बाबीर देवस्थान हे पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नसुन राज्याबाहेर या देवस्थानाचे नावलौकिक आहे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपल्या समाजाला आरक्षण देण्यासाठी तयारी केली असून समाजाने चिंता करु नये, असे आवाहनही प्रा. शिंदे यांनी केले. यावेळी बाळासाहेब मुरकुटे, शशिकांत तरंगे, अमोल भिसे यांनीही मनोगत व्यक्त केले.

  • आरक्षणचा शब्द अन्‌ लाईट गुल…
    पालक मंत्री राम शिदे मनोगतासाठी उभे राहिले. भाषणाची दमदार सुरुवात झाली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा शब्द मंत्री महोदयांच्या उच्चारातच वीज गेल्याने माईक बंद पडला. बघा किती अडचणी येतात, असे सांगून मंत्री शिंदे यांनी वीज सुरू करण्याची विनंती आयोजकांना केली. वीज आली पण, माईक आणि आरक्षणाचा विषय चांगलाच रंगला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)