दिवाळीच्या मुहूर्तावर ई-बस दाखल

– पुढील काही दिवस होणार चाचणी

पुणे – पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली इलेक्‍ट्रिक बस अखेर बुधवारी शहरात दाखल झाली. बीवायडी (ओलेक्‍ट्रो) कंपनीची 9 मीटर लांबीची “नॉन बीआरटी’ ही बस आहे. प्रायोगिक तत्वावर या बसची ट्रायल गुरूवारी घेण्यात येणार असल्याची शक्‍यता पीएमपीतील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमपीच्या ताफ्यात 500 वातानुकूलित ई-बस भाडेकराराने घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार साधारण दोन महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. यानूसार 9 मीटर लांबीच्या बससाठी बीवायडी (ओलेक्‍ट्रो) कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे. 12 मीटर लांबीच्या बससाठी टाटा कंपनीसह बीवायडी कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे. यातील इलेक्‍ट्रो कंपनीच्या बसची ट्रायल शहरात घेण्यात येणार असून ही बस दाखल झाली आहे. ट्रायलदरम्यान “सीआयआरटी’ आणि पीएमपी प्रशासनाकडून बसचा परफॉर्मन्स पाहला जाणार असून यानंतर उर्वरीत प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. वातानुकूलित ई-बसमध्ये पहिल्या टप्प्यात 150 आणि दुसऱ्या टप्प्यात 350 बसेस घेण्याचे नियोजन आहे. या बस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्‍ट बेसिस (जीसीसी) या तत्त्वावर घेण्यात येणार आहे.
————–
वातानूकुलित सेवा , 31 सीटची आसनव्यवस्था
नव्याने दाखल झालेली बस 9 मीटर लांबीची असल्याने बसमध्ये 31 सीट असून वातानूकुलीत बस आहे. काही महिन्यांपुर्वी दाखल झालेल्या मिडीबसमध्येही एवढीच सीटमर्यादा आहे. दरम्यान, एसी बसमध्ये बसण्याची व्यवस्था आरामदायी असल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
————–

बसची वैशिष्टे
– 9 मीटर लांबी
– वातानूकुलीत बस
– नॉन बीआरटी
– लाल रंग
– बीवायडी (ओलेक्‍ट्रा) कंपनी

———————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)