मुंबईत ड्रंक ऍन्ड ड्राईव्हच्या 455 केसेस

मुंबई: मुंबईत नववर्ष स्वागताच्या दिनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी काल रात्री मोठी मोहीम उघडली होती. या मोहिमेअंतर्गत मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात एकूण 455 केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री पासून सकाळी 6 वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेद्वारे पोलिसांकडून एकूण 1533 वाहन चालकांची ब्रेथ अनालायझर टेस्ट घेण्यात आली. त्यात हे वाहन चालक दोषी आढळले. मुंबई शहर आणि उपनगरात न्यु ईयर सेलिब्रेशनचे मोठे फॅड असते. रस्त्यावरही मध्यरात्री मोठा उत्सव सुरू असतो. त्या गर्दीत कोणी गैरप्रकार करू नयेत म्हणूनही पोलिसांनी महत्वाच्या ठिकाणी काल रात्रीपासूनच मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या या सक्त पहाऱ्यामुळे कॅबला काल मोठी मागणी होती. तसेच टॅक्‍सी चालकांनीही काल आपली चांदी करून घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)