शबरीमला हिंसाचार प्रकरणी452 जणांवर गुन्हे दाखल

केरळ पोलिसांकडून 2061 जण ताब्यात

तिरूअनंतपुरम –
केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आंदोलन करताना हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी 2016 नागरिकांना ताब्यात घेतले आहे. तर 452 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी दिली.

बेहरा म्हणाले, आम्ही सुमारे 450 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सुमारे 2000 लोकांना ताब्यात घेतले आहे. हिंसाचार केल्याप्रकरणी इतर अनेकांचीही ओळख पटली असून आणखी लोकांना ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करताना महिलांना मंदिरात प्रवेश देताना सुरक्षा पुरवण्यासाठी काय करता येईल, यासाठी पोलीस कमिटीकडून सूचना मागवण्यात येत आहेत. याबाबत अद्यापही चर्चा सुरु असून आम्ही कुठल्याही निर्णयाप्रत आलेलो नाही, असेही त्यांनी सांगितले.

केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशापासून रोखता येणार नाही असा आदेश नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर या निर्णयाविरोधात शबरीमला मंदिर परिसरात अनेक हिंदू संघटनांकडून जोरदार विरोध करण्यात आला. आंदोलकांनी या मंदिरात महिलांना जाण्यापासून रोखले. प्रसंगी दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली होती. या घडामोडीत मंदिराचे दरवाजे ठराविक काळानंतर बंद झाल्याने महिलांना या मंदिरात प्रवेश करता आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)