45 GB डेटा मोफत मिळवण्याची व्होडाफोनची ऑफर

मुंबई : व्होडाफोनने नवीन स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. अमेझॉनवर नवीन 4G स्मार्टफोन खरेदी केला तर ग्राहकांना व्होडाफोनकडून 45 GB डेटा दिला जाणार आहे. 11 मे रोजी ही ऑफर सुरु करण्यात आली आहे.
व्होडाफोनच्या या नव्या ऑफरनुसार 1 GB किंवा त्यापेक्षा अधिकचा प्लॅन घेतल्यास 9 GB डेटा दिला जाईल. सलग पाच महिन्यांसाठी 9 GB म्हणजे एकूण 45 GB डेटा ग्राहकांना मिळेल. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना 30 जूनपर्यंत अमेझॉनवर एक्‍स्कुझिव्ह उपलब्ध असणारा 4G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल. 1GB डेटावर 9GB डेटा मिळवा, असा मेसेज प्रीपेड ग्राहकांना नव्या स्मार्टफोनमध्ये सिम टाकल्यानंतर येईल. हा 9GB डेटा 28 दिवस वापरता येईल. 1GB प्लॅनच्या रिचार्जनंतर आपोआप 9GB डेटा दिला जाईल. पाच वेळा या ऑफरचा फायदा घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)