अमेरिकेचा रोबो “इनसाइट’ मंगळावर सुखरूप उतरला 

वॉशिंग्टन (अमेरिका): अमेरिकेचा रोबो इनसाईट (इंटिरियर एक्‍स्प्लोरेशन युजिंग सिस्मिक )मंगळावर सुखरूप उतरला आहे. भारतीय वेळेनुसार सोमवरी रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईटने मंगळाच्या पृष्ठभागावर पाऊल टाकले. इनसाइटचे मंगळावर सुखरूप उतरणे एक मोठा ऐतिहासिक क्षण असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. इनसाईट मंगळावर उतरण्यापूर्वीची 7 मिनिटे अत्यंत महत्त्वपूर्ण होती. इनसाइट मंगळवार उतरण्याची प्रक्रिया सात टप्प्यांत पार पडली. मंगळावर उतरल्यानंतर इनसाइट पॅरॉशूटमधून बाहेर पडले आणि आपल्या तीन पायांवर उभे राहिले.

ताशी 19,800 किलोमीटर्स वेगाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या इनसाइटचा वेग मंगळावर उतरण्यापूर्वी ताशी 8 किलोमीटर्स इतका कमी करण्यात आला. पुढील सहा मिनिटात तो आणखी कमी होऊन इनसाइट सुखरूपपणे मंगळावर उतरले. सुमारे दोन महिने मंगळावर वास्तव्य करून इनसाइट मंगळाबद्दल अद्याप अज्ञात असलेली माहिती पृथ्वीवर पाठवणार आहे. इनसाईट मंगळावर एक सिज्मोमीटर ठेवणार आहे. यामुळे मंगळाच्या अंतर्भागासंबंधी माहिती मिळू शकेल. मंगळावर भूकंप होतात की नाही, याची माहितीही त्यामुऴे मिळ्णार आहे. मंगळाचा पृष्ठभाग उकरून इनसाइट त्याची माहिती जमा करणार आहे.

अमेरिकेचे मिशन मंगळ सुमारे 1 अब्ज डॉलर्स, म्हणजे 7044 कोटी रुपये खर्चाचे होते. 5 मे 2018 रोजी अंतरिक्षात सोडण्यात आलेल्या इनसाइटने 48.2 कोटी किमी प्रवास करून मंगळ गाठला आहे. त्यासाठी त्याला पाच महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)