45 हजार थकबाकीदारांची “लाईट कट’

महावितरणची कारवाई : 18 कोटी 73 लाखांची थकबाकी

पुणे – वारंवार आवाहन करूनही वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 45 हजार 79 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 18 कोटी 73 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी मागील 15 दिवसांत खंडित करण्यात आला.

गेल्या पंधरवड्यात पुणे शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 28 हजार 620 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 8 कोटी 13 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला. भोसरी व पिंपरी विभागअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील 8520 वीजग्राहकांकडे 5 कोटी 26 लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभाग अंतर्गत मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्‍यातील 7 हजार 939 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 5 कोटी 34 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे.

थकबाकीमुळे तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्यास थकबाकीच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क (रिकनेक्‍शन चार्जेस) भरणे नियमानुसार आवश्‍यक असून त्यानंतरच संबंधित थकबाकीदाराचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. नियमानुसार लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी 50 रुपये तर थ्री फेज कनेक्‍शनसाठी 100 रुपये तर उच्चदाब वीजग्राहकांसाठी 500 रुपये पुनर्जोडणी शुल्क आहे. हे शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन सोय उपलब्ध नसल्याने थकबाकीदारांनी थकीत रक्कम व पुनर्जोडणी शुल्क कार्यालयीन वेळेत भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

सुटीदिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरू
थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा, म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत स्थानिक वीजबिल भरणा केंद्र दि. 29 व 30 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)