भाजपाचा डाव उधळून लावण्यास सतर्क रहावे : आ. शिवेंद्रराजे

सातारा-अच्छे दिनाचे दिवा स्वप्न दाखवून सता काबीज केली. मात्र, विकास तर नाहीच, उलट त्यांचे कार्यकर्त्यांनीही न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आलेत. तेंव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकत्यांनी सतर्क राहून विरोधकांच्या भूल थाप्पाना बळी पडू नये. असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. वेण्णानगर येथे रस्त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर कण्हेर येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.

तेव्हा आ. शिवेंद्रराजे भोसले मार्गदर्शन करीत होते. प्रारंभी वेण्णानागर ते वेळेकामथी रस्त्याचे भूमीपूजन व विविध विकास कामांचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा समारोप कण्हेर येथे झाला. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य प्रतीक कदम होते. यावेळी जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे, कृषी सभापती मनोज पवार, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, सतीश चव्हाण, सर्जेराव सावंत, शिवाजीराव चव्हाण, जितेंद्र सावंत, किरण साबळे-पाटील, दिलीप निंबाळकर, सरिता इंदलकर आदी मान्यवर उपस्थित होते. आ. भोसले म्हणाले,विरोधक सामान्यजनांना त्रास देण्याचा उद्योग करतील. तेंव्हा पक्षाच्या विचाराबरोबर ठाम राहिले पाहिजे. वसंतराव मानकुमरे म्हणाले, आपआपसातच मतभेद निर्माण केले तर विरोधकांचे फावले जाते.

प्रतिक कदम म्हणाले, आ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या मतदार संघात (गटात) विकास कामे करीत आहे. तात्यासाहेब वाघमाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रभाकर पवार यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास सरपंच राजश्री चव्हाण, इंद्रजित ढेंबरे, दादासाहेब बडदरे, राजेंद्र लांवघरे, नामदेवराव सावंत, अरुण कापसे, रमेश चव्हाण, सुरेश टिळेकर, अरुण पवार, महेश गाडे,मच्छिन्द्र चोरगे, रघुनाथ जाधव, विश्वजीत लाड आदी मान्यवर-कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)