44 पदांकरिता 447 अर्ज

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन विभागातील रिक्त फायरमन पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मानधन तत्त्वावर 44 पदांकरिता महापालिका प्रशासनाला एकूण 447 अर्ज प्राप्त झाले आहेत. तपासणीअंती 144 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलात फायरमन संवर्गाची 101 पदे मंजूर आहेत. त्यापैकी आतापर्यंत महापालिकेने 80 पदे कायमस्वरुपी तत्त्वावर भरली आहेत. मात्र, राज्य सरकारने नोकर भरतीस मनाई केली आहे. त्यामुळे 21 पदे अद्यापही रिक्‍त आहेत. शहराची लोकसंख्या 22 लाखांवर पोहचली आहे. चिखली कुदळवाडी येथे नवीन उपकेंद्राचे कामकाज करण्यासाठी वाढीव 23 पदे मानधन तत्त्वावर भरण्यास अग्निशमन दलाने महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. महापालिका प्रशासनाने 17 जानेवारी 2018 रोजी महापालिका प्रशासनाने या भरतीला विशेष परवानगी दिली आहे.

त्यानुसार अग्निशमन दलाने केलेल्या आवाहनानुसार एकूण 447 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये एकत्रित मानधन दिले जाणार आहे. 447 अर्जांपैकी 144 अर्ज पात्र ठरले आहेत. याशिवाय 21 उमेदवारांनी बारावी परीक्षा पास झाल्याचे प्रमाणपत्र सादर केलेला नाही. 79 उमेदवारांनी फायरमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला नाही, तर 147 उमेदवारांनी अर्ज स्वयंसाक्षांकित केलेला नाही. याशिवाय 12 अपूर्ण अर्ज, 40 उमेदवारांच्या फायरमन पाठ्यक्रमाचा निका जाहिर झालेला नाही. दोन उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सादर केलेले नाही, तर 25 अर्ज मुदतीनंतर प्राप्त झाले आहेत.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, अग्निशमन दलाचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढलेला आहे. या तात्पुरत्या स्वरुपाच्या मानधन तत्वावरील कर्मचारी भरतीस मान्यता मिळाल्यास, हा ताण हलका होण्यास हातभार लागणार आहे.
– किरण गावडे,
मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)