महावितरणाच्या विरोधात स्वाभिमानी आक्रमक

अनावश्‍यक आकारणी थांबवा अन्यथा खंडणीचे गुन्हे दाखल करू : राजू शेळके
नागठाणे – महावितरणकडून घरगुती तसेच कृषी पंप कनेक्‍शनच्या माध्यमातून चालविलेली लूट तात्काळ थांबवा तसेच विना नोटीस वसुली कराल तर खंडणीचा गुन्हा दाखल करून जशास तसे उत्तर देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे. नागठाणे येथे वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

“स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी आज मंगळवारी येथील वीज वितरणच्या विरोधात मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष राजू शेळके, महाराष्ट्र माथाडी श्रमजीवी कामगार संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय निकम, नागठाणेचे सरपंच विष्णु साळुंखे, राजू केंजळे, अविनाश साळुंखे-पाटील, अर्जुन साळुंखे, नारायण साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, रामचंद्र निकम, दीपक नलवडे यांच्यासह परिसरातील विविध गावांमधील पदाधिकारी शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

-Ads-

वीज नियामक आयोगाची भीती दाखवून वीज वितरणकडून नागरिकांची लूट करण्याचा प्रकार सुरू आहे. विद्युत ग्राहकाला व शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक पुरवठा बंद करण्यात येत आहे. तसेच विद्युत दरात अचानक वाढ करण्यात येत असून विद्युत दाब अचानक वाढल्यामुळे घरगुती उपकरणांचे व कृषी मालाचे नुकसान होत आहे. या नुकसानीची भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध अधिभार लावून लुट करण्यात येत आहे. जळालेला फ्युज, डीपी बदलण्यासाठी वर्गणी स्वरूपात खंडणी गोळा करण्यात येत आहे. या सर्व तक्रारींचे निवारण तात्काळ करून पठाणी वसुली थांबविण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

विद्युत वितरण कंपनीच्यावतीने कार्यकारी अभियंता सातारा विजय कुमार जाधव, शाखा अभियंता अजय ढगाळे यांनी या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तात्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)